
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
उर्जित पटेल यांचा राजीनामा आणि आज जाहीर झालेले पाच राज्यांमधले विधानसभा निवडणुकांचे निकाल यांमुळे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया तब्बल 110 पैशांनी लुढकला आणि 72.42 वर पोहोचला. तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक स्तरावर वाढत चाललेला व्यापार तणाव या बाबीही रुपयाच्या घसरणीसाठी कारणीभूत ठरल्या. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमधले विधानसभा निवडणुकांचे निकाल जसजसे जाहीर झाले तसतशी रुपयाची घसरणही झाली. सोमवारी रुपयाने 50 पैशांनी कोलांटउडी घेतली आणि तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 71.32 वर पोहोचला होता.



























































