मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील चार भाजप खासदार गैरहजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pm modi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार कानपिचक्या देऊनही बैठकीला दांडी मारण्याची परंपरा भाजप खासदारांनी कायम ठेवली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे चार खासदार गैरहजर राहिले.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजप खासदारांच्या बैठकीत काय बोलणार याकडे साऱयांचे लक्ष होते, मात्र पंतप्रधानांनी निवडणूक विषयाला स्पर्शही न करता खासदारांना उपदेशाचे डोस पाजले. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, खासदार भोला सिंग यांच्या कार्याला उजाळा देत अटलजींसारखे पक्षासाठी समर्पण द्या असे आवाहन केले आणि बैठक आटोपली, मात्र या बैठकीला भाजपचे अनेक खासदार अनुपस्थित होते. महाराष्ट्रातील खासदार संजयकाका पाटील, शरद बनसोडे, रक्षा खडसे, प्रीतम मुंडे हेही गैरहजर राहिले.