बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील विजय झाडे हा शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली.

विजय झाडे रात्री आपल्या शेतावर पहाऱ्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून जखमीला वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याची या परिसरात दहशत सुरू आहे, वन विभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.