‘केसरी नंदन’मधून आलोक छोट्या पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

कलर्स वाहिनीवर लवकर ‘केसरी नंदन’ मालिका सुरू होत आहे. राजस्थानमध्ये राहात असणार्‍या पुटुंबाची ही कथा आहे. खरं तर केसर (चाहत तेवानी) नावाच्या तरुण मुलीची कथा आहे. केसरीला वडिलांप्रमाणे पहेलवान व्हायचे आहे. कुस्तीवीर असणार्‍या आणि पुरोगामी विचारांच्या केसरीच्या वडिलांची म्हणजेच हनुमंत सिंग यांची भूमिका साकारलेय मानव गोहिल याने.

त्यांच्या मालकीचा गुरू हनुमान आखाडा आहे. त्यांचे एकमेव स्वप्न आहे त्यांच्या मुलाने त्यांचा चमकदार वारसा पुढे न्यावा आणि देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकावे. ‘केसरी नंदन’मध्ये हनुमंत सिंगच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारलेय ‘डान्स दिवाने’चा विजेता आलोक शॉ याने.  आलोकने  हनुमंत सिंगच्या मोठ्या मुलाची म्हणजे जगतची भूमिका साकारली आहे. टेलिव्हिजनवरील पहिल्या पदार्पणाविषयी आलोक सांगतो, ‘डान्स दिवाने’ संपल्यानंतर लगेच मला ही संधी मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. मी केसरीच्या मोठ्या भावाची भूमिका करत आहे, हा माझ्यासाठी अतिशय वेगळा अनुभव आहे आणि मी त्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. प्रोमोच्या चित्रीकरणासाठी नुकतेच आम्ही जैसलमेरला गेलो होतो आणि तो अनुभव मी कधीच विसरू शकत नाही.