
सामना प्रतिनिधी, मलकापूर
शहरातील सिनेमा रोडवरील जाजू ड्रेसेस या कापड दुकानाला पहाटे तीन वाजता भीषण आग लागली. याबाबतची माहिती अंबिका साडी सेंटर संचालक खंडेलवाल यांनी नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, नगरसेवक अनिल गांधी दुकान मालक जाजू यांना दिली.
क्षणाचाही विलंब न लावता नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ, नगरसेवक अनिल गांधी, जावेद कुरेशी नगरपालिकेचे अग्निशमन दलासह घटनास्थळी हजर झाले. आगीने रौद्र रूप धारण दुकानाला गिळंकृत केल्याने दुकानातील संपूर्ण कापड जळून पंधरा लाखाच्या आसपास नुकसान झाले. या आगीची झळ आजूबाजूंच्या दुकानाला बसू नये या करता अग्निशमन दलांच्या वासुदेव भोपळे, सुरजसिंग राजपूत, वाकोडे आदी जवानांनी आग आटोक्यात आणली. शार्टसर्किटमुळे सदर आग लागून जाजू यांचे मोठे नुकसान झाले आहे.




























































