कोकणतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार; शिक्षकांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या होत्या. कोकणात बदली प्रक्रिया न राबविल्यामुळे शिक्षकांवर अन्याय झाला होता. अखेर शिक्षकांनी त्याविरोधात मंत्रालय स्तरावर आवाज उठवला होता. त्याला आता न्याय मिळवला आहे. शालेय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्रालयाने कोकणातील शिक्षक बदल्यांची प्रक्रिया त्वरीत राबविण्याचा आदेश जिल्हापरिषदांना दिला आहे. कोकणातील शिक्षकांनी बदली हवी पथक स्थापन करून विश्वास बेलवलकर यांनी कोकणातील शिक्षकांच्या बदल्या करा अशी मागणी अश्विनी खानविलकर यांच्यातर्फे ग्रामविकास मंत्रालयाकडे केली होती. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सचिव असीम गुप्ता आणि ग्रामविकास विभागाने कोकणतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या त्वरीत कराव्यात असे आदेश जिल्हापरिषदांना दिले आहेत.त्यामुळे ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या होणार आहेत.