नांदेड शहर आणि जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. गेल्या 24 तासात पासून नांदेडकरांना सूर्यदर्शन होऊ शकले नाही शकले नाही. मंगळवारी सकाळी नांदेडचे तापमान 14 वर्षापर्यंत खाली उतरले होते तर किमान तापमान 21 अंश नोंदले गेले.

थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाले असले तरी गेल्या दोन महिन्यात थंडीच न पडल्याने शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे. हरभरा गहू या पिकाच्या वाढीला हे वातावरण पोषक असल्याचे शेतकरी तज्ज्ञांनी सांगितले. थंडीचा हा गारवा आणखी दोन दिवस तरी राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे 38 80 डिग्री टेम्परेचर मध्ये असलेल्या नांदेडकरांना गेल्या तीन दिवसात या गुलाबी थंडी नि सुखद धक्का दिला आहे अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर जॅकेट कानटोप्या आता बाहेर पडले आहेत.