
सुरेखा पुणेकर
…करून शिणगार साजा!
आवडती फॅशन …साडी, जिन्स टिशर्ट, लेगिन-कुर्ता आवडतो.
फॅशन म्हणजे…फॅशन ही फॅशन असते. काळाप्रमाणे बदलते ती फॅशन. ज्याला जे आवडतं ते करतो.
व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता?…मी सगळ्या प्रकारचे कपडे वापरले आहेत आणि वापरते. फक्त तोकडे कपडे कधी आवडले नाहीत.
फॅशन म्हणजे केवळ कपडे की?… फक्त कपडे नाही. तुमची केशरचना, तुमचं चालणं, बोलणं. पायाच्या नखापासून केसापर्यंतचा प्रत्येक भाग हा फॅशनमध्ये येतो.
आवडती हेअरस्टाईल?…लावणी करताना जसे केस बांधते आंबोडा घालून, पंजाबी ड्रेस घातला असेल तर अर्धे केस मानेवर आणि अर्धे केस बांधते. केस तोंडावर आवडत नाही.
फॅशन जुनी की नवी?…मला शक्यतो जुनीच फॅशन करायला आवडते आणि माझा कल हा जुन्या फॅशनकडे जास्त असतो. कधी कधी मी चोळी घालते. कधी काठपदराची साडी असेल तर चोळी घालते. पण काळाप्रमाणे वागायलाही आवडतं.
आवडता रंग?…करडा आणि पांढरा.
तुमच्या जवळच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते?…सहावारी, नऊवारी साडी मला छान दिसते असे सगळेच सांगतात. बांधा चांगला असल्याने चांगली वाटते.
स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…आवडते. दादर, फॅशन स्ट्रीट, पुण्यात तुळशीबागेत करते. काही गोष्टी अशा असतात की दुकानात खूप महाग असतात आणि आमचे असे असते की, एकदा एका कार्यक्रमाला वापरले की पुन्हा दुसऱया कार्यक्रमाला चालत नाही. त्यामुळे आम्ही कमीतकमी तसा प्रयत्न करत असतो. जे स्टेजसाठी वापरतो ती अशीच खरेदी करतो.
कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता?…नऊवारी, सहावारी साडय़ांवर खर्च करते. कसं आहे आपण जे कमावतो ते लावणीवरच कमावते. त्यामुळे लावणीबरोबरच साडय़ांबाबतही मी फार दक्ष असते.
ज्वेलरी काय आवडते?…सोन्याचे दागिने.
आवडता ब्रॅण्ड…नल्लीजच्या साडय़ा.
फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…मी थेट दुकानात जाते. तिथे सध्या नवीन काय आहे असे विचारते आणि ते विकत घेते.
फॅशन फॉलो कशी करता…फॉलो करायची गरज लागत नाही. माझी डिझायनर मला अपडेट ठेवते.
ब्युटी सिक्रेट…सदा हसतमुख असणे.
टॅटू काढायला आवडेल का?…कधीच आवडला नाही. ते माझ्या बुद्धीला पटतच नाही.
तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी…लिपस्टिक, टिकली, कानातले.
फिटनेससाठी…नियमित चालायला जाते. लावणीचा कार्यक्रम असेल तर नाही चालत. कारण लावणी करतानाच माझा व्यायाम होऊन जातो.






















































