सिम्बाच्या ‘आँख मारे’ गाण्याला 1.27 कोटी व्ह्यूज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि रणवीर सिंग प्रमुख भुमिकेत असलेल्या सिम्बाचे ‘आँख मारे’ हे गाणे युट्युबवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून या गाण्याला आतापर्यंत 1.27  कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.


हे गाणे 1996 साली आलेल्या तेरे मेरे सपने या चित्रपटातील गाण्याचे रिमेक आहे. 5 डिसेंबर रोजी टी सीरजच्या युट्युब चॅनेलवर हे हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात रणवीर सिंग आणी सारा अली खान ताल धरताना दिसत आहे. नंतर गाण्यात श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमूही आहे. तर मूळ गाणे ज्याच्यावर चित्रित झाले आहे त्या अर्शद वारसीची special entry आहे.