रामजन्मभूमीवर दावा नाही हक्क सांगतोय; हिंदू राष्ट्र, हिंदूभूमी आहे, घेऊनच राहणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

‘संतांचे वचन आपल्याला पूर्ण करायचे आहे, अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचे मंदीर उभारायचे आहे. प्रभू श्री रामांना समजून घेण्यासाठी तरुणांनी अयोध्येकडे कूच करावी लागेल. अयोध्या ही भूमी संतांची, गौतम बुद्घांची, भगवान महावीरांची, पुरुषोत्तम श्री राम यांची जन्मभूमी आहे. येथे हजारो कारसेवकांनी बलिदान दिले आहे. कोठारी बंधुंनी बलिदान दिले, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. आम्ही रामजन्मभूमीवर दावा करत नाही तर हक्क सांगत आहोत. हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदूभूमी आहे, आम्ही घेऊनच राहणार. आता फक्त आश्वासनाने काही होणार नाही, तर कायद्याने होईल. म्हणून राम मंदिरासाठी संसदेत कायदा करावा’, असे आवाहन विश्व् हिंदू परिषदेचे मुबई क्षेत्रीय मंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.

श्री राम मंदिर निर्माणासाठी नगर दक्षिण जिल्हा विश्व् हिंदू परिषद बजरंगदल यांनी गांधी मैदानात हुंकार सभेचे आयोजन केले होते याप्रसंगी विश्व् हिंदू परिषदेचे मुबई क्षेत्रीय मंत्री शन्करजी गायकर बोलत होते. यावेळी प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर, सज्जनगडचे महंत मोहनबुवा रामदासी, हभप.राम महाराज झिंजुर्के, हभप. आदिनाथ महाराज शास्त्री, संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री डॉ. विजय देशपांडे, शहर उपाध्यक्ष्य ऍड.जय भोसले, प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.