प्रथमच ऑनलाइन होणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) उद्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई विद्यापीठातर्फे यंदा प्रथमच ऑनलाइन घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) येत्या रविवारी होणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिह्यांमधील 56 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

चार विद्या शाखांमध्ये 78 विषयांमध्ये घेतल्या जाणाऱया या परीक्षेसाठी एकूण 6168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील 4628 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुण्यातील 329, नाशिकमधील 211 आणि नगरमधील 100 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

महाराष्ट्राव्यतिरिक्त दिल्लीतील 18, गोवा 17 आणि गुजरातमधील 30 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रविवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत ‘पेट’ परीक्षा होणार आहे. त्या दिवशी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने विद्यार्थ्यांनी केंद्रावर परीक्षेच्या एक तास अगोदर पोहचणे गरजेचे आहे. ओळखपत्र आणण्यास विसरू नये असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.