मानखुर्द बालगृहातून 9 वर्षांचा मुलगा बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑलाईन । मुंबई

न्यायालयाच्या आदेशानंतर मानखुर्दच्या बालगृहात ठेवण्यात आलेला 9 वर्षांचा मुलगा बुधवार सकाळपासून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी त्या मुलाला बालगृहात आणण्यात आले होते. बुधवारी सकाळी हजेरी घेतली तेव्हा तो मुलगा होता. नंतर तो मुलगा बालगृहात नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याचा दिवसभर शोध घेण्यात आला. पण तो कुठेच मिळून न आल्याने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मुलाचा शोध घेत आहेत.