
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबई डबेवाला असोसिएशनने गरीब घरातील विद्यार्थ्यांसोबत ख्रिसमस म्हणजे नाताळचा सण साजरा केला. सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू आणतो, त्यांना केक देतो अशी अख्यायिका आहे. विक्रोळी पार्कसाईटमधील अग्रसेन हिन्दी विद्यालयातील मुलांसाठी डबेवाले सांताक्लॉज बनून आले होते. या डबेवाल्यांनी या चिमुरड्यांना भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्यासोबत ख्रिसमसचा आनंद साजरा केला




























































