दत्त दर्शनासाठी बीड लोटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहरातील ऐतिहासिक दत्त मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

गेले सात दिवस श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहचे व गुरूचरिञ कथा सोहळा १६ डिसेंबर पासुन सुरु करण्यात आला होता. शनिवारी उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली. सायंकाळी वेद शास्त्र पंडीत अनंत शास्त्री यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.