किसान दौडला दणदणीत प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

‘किसान दिन’ निमित्ताने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रासायनिक पदार्थाचा वापर केल्यामुळे मानवी आरोग्य कसे धोक्यात आले आहे याची समाजाला जाणीव करून देण्यासाठी अंबागोपाल फाऊंडेशन तसेच टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या वतीने शिवाजी पार्क दादर ते सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी किसान दौडचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मावळमधील शेतकऱ्यांसह दहा हजार मॅरेथॉनप्रेमींनी यामध्ये सहभाग घेतला हे विशेष.

या कार्यक्रमाला अंबागोपाल फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी, खासदार राहुल शेवाळे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. यावेळी सिक्कीम राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यदेखील 100 टक्के सेंद्रिय शेती असलेले राज्य करू असा निर्धार अंबागोपाल फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीश शेट्टी यांनी व्यक्त केला. विशेष बाब म्हणजे यावेळी टाटा रुग्णालयामधील गुणवंती संघवी या कॅन्सरपीडिताने कार्यक्रमाचे उद्घाटन करून भेसळयुक्त अन्नापासून दूर राहण्याचा संदेश दिला.