तिहेरी तलाकसह समान नागरी कायदा, कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्नही सोडवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arvind-sawant

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर हे विधेयक मतदानासाठी ठेवले जाणार आहे. विविध पक्षांचे खासदार भूमिका मांडत आहेत. यात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी तिहेरी तलाकवर आपली भूमिका मांडली आणि तिहेरी तलाकसह समान नागरी कायदा, कलम 370 आणि राम मंदिराचा प्रश्नही सोडवा अशी मागणी केली.

‘मुस्लिम भगिनींचे प्रश्न सोडवलेच पाहिजे मात्र त्याच बरोबर आपण सत्तेमध्ये येताना जनतेला आश्वासने दिलेली आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेष म्हणजे तिहेरी तलाक विधेयकात जम्मू-कश्मीर वगळून असा उल्लेख करण्यात आला आहे, परंतु मुस्लिम महिलांची संख्या याच भागात अधिक आहे. केवळ कलम 370 मुळे आपण त्यांना या विधेयकाद्वारे न्याय देऊ शकत नाही. म्हणूनच आपण दिलेले वचन जसे कलम 370 हटवने, समान नागरी कायदा आणणे याचाही विचार करणे आवश्यक आहे. तसेच राम मंदिराचा प्रश्नही न्यायालयाचा मान राखून सोडवला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी आहे’, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.