
साहित्य ः दोन वाटय़ा इडली रवा, एक वाटी उडीद डाळ, दहा-बारा मेथी दाणे, अर्धी वाटी किसलेलं चीज, एक चमचा मिरपूड, एक चमचा लाल सुक्या मिरचीचा चुरा, थोडं अमूल लोणी, चवीनुसार मीठ.
कृती ः सर्वप्रथम डाळ आणि रवा भिजत घालून त्या दोन्हीत थोडे थोडे मेथीदाणे घालावे. नंतर उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटावी. डाळ वाटून होत आली की, पाणी निथळून रवा घालून वाटावी. त्यात मीठ घालून ती मोठय़ा पातेल्यात झाकण ठेवून रात्रभर अडीचपट फुगेपर्यंत भिजत घालावी. दुसऱया दिवशी सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवून इडली पात्राच्या वाटय़ांना तेलाचा हात लावून प्रत्येकात इडली पीठ टाकून इडल्या तयार कराव्यात. तयार केलेल्या प्रत्येक इडलीला लोणी लावावं. वर चीज पेरून त्यावर मिरपूड आणि मिरचीचा चुरा पेरून 180 सेंटिग्रेडवर तापलेल्या ओव्हनमध्ये साधारण तीन-चार मिनिटं चीज वितळेपर्यंत ठेवाव्या. गरमागरम वाढाव्यात.






























































