
सामना प्रतिनिधी । कल्याण
पालिकेच्या पार्किंगची जागा हडप करणाऱ्या बिल्डरला कोणतीही बांधकाम परवानगी देऊ नये, असे आयुक्तांचे आदेश असतानाही बोरगावकर कॉम्प्लेक्समधील व्यापारी गाळ्यांची बेकायदा तोडफोड करून लॉजिंग बार्ंडग सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बिल्डरने 3 जानेवारी रोजी लॉजिंग बार्ंडगचे उद्घाटन ठेवले असून काही मोजक्या अधिकाऱयांना याचे निमंत्रण धाडले आहे.
1994 साली एस. जी. बोरगावकर यांनी मायाशंकर पांडे या बिल्डरला या भूखंडातील 303 चौरस मीटरचा भूखंड आणि त्यावरील टीडीआर दिला होता. बोरगावकर कॉम्प्लेक्स या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या इमारतीमध्ये तळमजला तसेच पोडीयममधील 3377. 37 चौरस मीटर क्षेत्र अद्ययावत पार्किंग बनवून पालिकेला हस्तातरित केल्या खेरीज टीडीआरचा किंवा या 303 चौरस मीटर भूखंड विकसित करता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने करारात स्पष्टपणे नमूद केले आहे. तरीही पालिकेचे आदेश धाब्यावर बसवत मायाशंकर पांडे यांनी 303 चौरस मीटर भूखंड विकसित केला. शिवाय या इमारतीमधील काही गाळ्याची तोडफोड करून तिसऱया मजल्यावर लॉजिंग बार्डिंग तयार केले आहे.

























































