वरळीतल्या रिलायन्सच्या गोडाऊनला आग, धुरामुळे अग्निशमन दलाचे 12 जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वरळीतील बावन्न चाळ येथील साधना मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या रिलायन्सच्या गोडाऊनला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात केबलचा साठा जळल्याने इथे मोठे धुराचे लोट पसरले आहे. आगीमुळे अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी झाले आहेत. तर अंधारामुळे कूलिंग ऑपरेशन राबवण्यात अडचणी येत आहेत.