नववर्षाचे स्वागत करताना सोनाली म्हणते, गोष्टी येतात आणि जातात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

नववर्षाचे स्वागत करताना कॅन्सरशी झुंज देणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. केस कापण्यापूर्वीचा फोटो शेअर करत सोनालीने लिहिलं, ‘‘केस कापण्यापूर्वीचा माझा हा फोटो. आता माझे केस हळूहळू काढत आहेत. त्यामुळे 2019 मध्ये मी पुन्हा अशी दिसू शकते. इथपर्यंतच्या प्रवासाने मला खूप शिकवलंय. कॅन्सरशी लढा देण्याच्या शरीराच्या इच्छाशक्तीपासून ते या काळात माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेल्या लोकांपर्यंत प्रत्येक गोष्टीने मला आयुष्याच्या अस्थिरतेची शिकवण दिली आहे. गोष्टी येतात आणि जातात हे शिकवलंय (माझ्या केसांप्रमाणेच). नवीन वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जाईल अशी आशा करते.’’