
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षाचे होते.
क्रिकेटच्या ‘किंगमेकर’ला सोशल मीडियाची श्रद्धांजली
आचरेकर गुरुजींनी हिंदुस्थानी क्रिकेट संघाला अनेक अनमोल हिरे दिले. यातील कोहिनूर म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिनचा क्रिकेटमधील पाया मजबूत करून मैदानावर शड्डू ठोकून गोलंदाजांची पिसे काढण्याची कला शिकवली ती आचरेकर गुरुजी यांनीच. काही दिवसांपूर्वी गुरुपौर्णिमेनिमित्त नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरने आचरेकर गुरुजींविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.
यावेळी सचिन म्हणाला होता की, आचरेकर सरांचे योगदान माझ्या आयुष्यात खूप मोठे आहे. सरांविषयीच्या भावना शब्दात व्यक्त करता येणार नाही. सरांनी आम्हाला घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली. आज मी जो काही उभा आहे तो सरांमुळेच. त्यांच्यासोबत सराव करताना आम्हाला स्वर्गीय आनंद मिळायचा. सरांबद्दल हृदयात प्रेम आहे. त्यांच्याबद्दल भीती नव्हे, आदर आहे.’
























































