
सामना प्रतिनिधी । नगर
नगर शहरात येणारी सुगंधी सुपारी फुड अॅण्ड ड्ग्जच्या अधिकार्यांनी धाड टाकून पकडली. सुपा येथे ही कारवाई करण्यात आली. सुपारीची वाहतूक करणाऱ्या झेंडीगेट येथील तरुणाला अटक करण्यात आली आहे. टेम्पोसह 44 लाखाची सुपारीही पोलिसांनी जप्त केली आहे. नजीर बाबा शेख (रा. झेंडगेट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुपा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कलिदास शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नजीर शेख टेम्पोतून सुपारी नगरात घेऊन येत होता. तो ही सुपारी कोणत्या व्यापार्याला देणार होता, तो व्यापारी कोण? याचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. त्यामुळं पोलिसांच्या रडारवर आता तो व्यापारीही आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
फूड अॅण्ड ड्रग्ज विभागाने सुपा एमआयडीसी भागात सापळा लावत वाहनांची तपासणी सुरू केली. आयशर टेम्पोची तपासणी करत असताना त्यात हिरा पान मसाला, हिरा सुगंधी तंबाखू, टेम्पो असा 44 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पथकाने चालक नजीर बाबा शेख याला ताब्यात घेत सुपारी आणि टेम्पो जप्त केला.































































