
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या बुलढाणा जिल्ह्यातील ११ पदाधिकार्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशान्वये व प्रदेश अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, जिल्हा अध्यक्ष संजय हाडे यांनी सूचवल्यानुसार महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे.
बुलढाणा जिल्हा सचिव पदी प्रशांत भाऊराव आढे, जिल्हा उपाध्यक्षपदी संजय भानुदास मोटे, मुकेश मुरलीधर सरोदे, बुलढाणा तालुका अध्यक्ष पदी नामदेव गंगाराम गुंडकर, बुलढाणा शहर अध्यक्ष अतुल रामदास घाडगे, खामगाव तालुका अध्यक्ष हीरा किसन मदारीवाले, खामगाव शहर अध्यक्ष शंकर सदाशिव खराडे, जळगाव जामोद तालुका अध्यक्ष गणेश श्रीराम धुळे, जळगाव जामोद शहर गणेश पांडुरंग धांडे, मलकापूर तालुका अध्यक्ष शरद प्रभाकर ठोसर, चिखली तालुका अध्यक्ष किशोर अभिमन्यू नेवरे यांचा समावेश आहे.

































































