‘सिंबा’चा सिक्वेल येणार, रोहित शेट्टीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉक्स ऑफिसवर ‘सिंबा’ने तुफान कमाई केल्यानंतर आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला असून 250 कोटींकडे वाटचाल सुरू आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

‘सिंबा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी ‘सिंबा’चा सिक्वेल येणार असल्याचा इशारा दिला होता. आता खुद्द रोहितनेच यावर शिक्कामोर्तब केला आहे. ‘सिंबा’च्या सिक्वेलबाबत बोलताना रोहित म्हणाला की, ‘आमच्याकडे सध्या ‘सिंबा’च्या दुसऱ्या भागासाठी कोणती कथा नाही, परंतु आम्ही यावर काम करत आहोत. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘सिंबा’चा जलवा कायम असून तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची रीघ कायम आहे. चित्रपटगृहांमध्ये अद्यापही ‘सिंबा’चे पोस्टर्स दिसत आहेत. त्यामुळे ‘सिंबा’चा सिक्वेल बनवण्याची घोषणा करणे थोडे घाईचे होईल. परंतु आम्ही नक्कीच 100 टक्के ‘सिंबा’-2 बनवू.परंतु कधी आणि त्याच कोण असेल हे नक्की सांगता येणार नाही.’

‘सिंबा’ला बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यातही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक शो हाऊसफुल्ला चालले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटात रणवीर सिंह पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे.

‘सूर्यवंशी’ची तयारी सुरू
दरम्यान, रोहित शेट्टी आपल्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असणार आहे. तसेच अजय देवगन आणि रणवीर सिंह देखील या चित्रपटात दिसेल. रोहितने या तिघांसह करण जोहरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ”सूर्यवंशी”मध्ये ही लोकं दिसणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


View this post on Instagram

Singham Simmba Sooryavanshi…Coming…Should I tell you Something that you don’t know???

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) on