
सामना प्रतिनिधी । मुंबई
येत्या 20 जानेवारी रोजी वोक्खार्ट रुग्णालयातर्फे पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन डॉक्टरांसाठी करण्यात आले आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेत तब्बल आठ संघ एकमेकांसमोर खेळणार असून यात विविध स्पेशालिटीमधील तज्ञ डॉक्टर मैदानात आपले सांघिक कौशल्य पणाला लावतील. या चँम्पियन्स ट्राँफीचे अनावरण रणजी क्रिकेटचे कोच अमित दानी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी स्पर्धेत सहभागी होणारे तब्बल 30 डॉक्टर्स आपल्या संघाच्या गणवेशात उपस्थित होते.




























































