नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांवात भीषण अपघात, बापलेकीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगावमधील न्यू इंग्लीश स्कूलच्या गेट समोर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील बापलेकीचा मृत्यू झाला. उसाच्या ट्रक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

बाबुर्डी येथील चौरंगीनाथ विठोबा शिर्के संक्रांत सणामुळे आलेल्या मुलीला सासुरवाडीला सोडवण्यासाठी जात असताना हायस्कूल समोर समोरासमोर दोन गाड्यांच्या अपघातामुळे उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन चौरंगीनाथ जागीच ठार झाले. त्यांची मुलगी संगीता कदम (पिंपळगाव सुटी जि. पुणे) ही मुलगी दवाखान्यात नेत असताना मरण पावली. दुसऱ्या गाडीवर पुणे जिल्ह्यातील दाम्पत्य होते. तेही गंभीर जखमी झाले आहे. परंतु दैव बलवत्तर म्हणून दोन्ही मोटारसायकलवरील लहान मुली सुखरूप बचावल्या.