शेतीच्या वादातून सख्या भावानेच घातला भावाच्या घरावर दरोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

शेतीच्या वादातून सख्या भावानेच भावाच्या घरावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.

आरोपींमध्ये बाळासाहेब मारुती पाचोरे (वय 35, बहारदाराबाद, ता.कोपगरांव), आकाश बाळासाहेब गायकवाड ( 21, आंबडेकर नगर, ता.राहता), योगेश कोंडीराम खंडीझोड ( 21, राहणार वेस, ता.कोपरगांव), प्रविण रामनाथ खंडीझोड (वय , सोयगाव, ता.कोपरगांव), अक्षय अशोक पारधे (वय, रा.पारधेवस्ती,अस्गाव रोड, ता.राहता) यांचा समावेश आहे तर यामध्ये विरेश सुरेश कोपरे हा फरार झाला आहे.

रात्रीच्या सुमारास संगमनेर रोड, पोहेगाव शिवारात, बहादराबाद, ता.कोपगरांव येथे फिर्यादी सुनिल मारुती पाचोरे ( 40, रा.संगमनेर रोड, पोहेगांव, शिवारात, बहादराबाद, कोपरगांव) हे त्यांच्या कुटुंबासह घरात झोपले असतांना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीकडे पाणी मागितले. अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादीस व त्यांच्या घरातील लोकांना दमदाटी शिवीगाळ मारहाण करुन घरातील 95 हजार 500 रुपये किंमतीचे रोख रक्कम व सोन्याचे दागिने बळजबरीने चोरुन नेले. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेचा तपास केल्यानंतर वरील पाच आरोपी हे सबंधी फिर्यादीचे सख्खे भाऊबंद असल्याचे उघड झाले होते. राहता येथे आकाश गायकवाड व त्याच्या साथिदारांसह पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर आरोपींना 8 हजार 500 रुपये गुन्हा करण्यासाठी देण्यात आले होते. फिर्यादी सुनिल पोचोरे हा आपला सख्या भाऊ असल्याचे सांगून शेतीवरुन वाद झाल्याने मी त्याचा बदला घेतल्याची कबुली देखील दिली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद माने, अशोक खरात, मिथुन घुगे, पोलिस हेड कॉस्टेबल इरफान शेख, पोना किरण कुर्‍हे, श्रीरामपूरचे पोलिस प्रमोद जाधव, फुरकान शेख, गोकुळदास पळसे, भगवान टकले यांच्या पथकाने केली.