
सामना प्रतिनिधी । बीड
बीड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार रेणुका मुकुंद भालेकर यांनी मुसंडी घेतली आहे. संपूर्ण वार्डात भगवे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य शिवसैनिक विजयासाठी सरसावला आहे. त्यामुळे भालेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीडनगर परिषदेच्या एका वार्डात नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे पोटनिवडणूक होत असून शिवसेना-भाजप-रिपाई गटाच्या उमेदवार रेणुका मुकुंद भालेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सामान्य शिवसैनिक विजयासाठी सरसावला आहे. सोमवारी त्यांच्या प्रचारकार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसेना- भाजप व रिपाई गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




























































