
सामना प्रतिनिधी । नगर
सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची झळा शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने नगर तालुक्यासह दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या, चारा डेपो सुरू करावे, चारा उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री राम शिंदे यांचे वाहन अडवण्याचा इशारा दिला. तसेच शेतकऱ्याचे प्रश्न सोडविता येत नसेल तर झेंडावंदन करू देणार नाही असा इशारा कार्ले यांनी दिला आहे.
जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर झाली आहे, तीव्र पाणी टंचाई असल्याने शेतकरी व पशुपालकांनी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रजासत्ताकदिनाच्या खरा अर्थ सर्व सामान्य जनतेच्या अत्यंत अडीअडचणीच्या काळात कोणत्या मदतीचे कर्तव्य सरकार म्हणून पार पाडत नाही. पाणी आणि चाऱ्यासाठी शेतकरी वनवन फिरत आहे. अशा परिस्थितीत प्रशासन जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था नाही, पशुधन व शेतकरी वाचविण्यासाठी आपले कर्तव्य म्हणून जिल्ह्यात 25 जानेवारीपर्यंत चारा डेपो व छावणी व दावणीवर जनावरे निहाय अनुदान सुरू करावे अन्यथा पालकमंत्री यांना प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणापासून रोखण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर प्रशासनाने दखल न घेतल्याने 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही असा इशारा बाळासाहेब हराळ, रामदास भोर, डॉ. दिलीप पवार, राजू भगत, जिवा लगड, संदीप गुंड, प्रकाश पोटे, योगेश लांडगे, गुलाब शिंदे, महेश काळे अतुल शिंदे यांनी दिला. तसेच नगर महाआघाडीचे शिवसेना व काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य सहभागी होणार असल्याचे कार्ले यांनी सांगितले.





























































