कुडाळ- मालवणसाठी 1 कोटी 63 लाखाचा  निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मच्छीमारी बंदरांचा विकास योजनेअतंर्गत कुडाळ मालवण मधील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. स्थानिक मच्छिमार व नागरिकांची मागणी लक्षात घेता आमदार वैभव नाईक यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

मालवण धुरीवाडा चिवला बीच खडकापर्यंत जाणारा जोडरस्ता तयार करणे यासाठी १६.५४ लाख, मालवण दांडी दांडेश्वर येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २१.३९ लाख, मालवण दांडी आवार येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २४.८७ लाख, मालवण दांडी मोरेश्वरवाडी येथे ओटा, बंधारा करणे २१.४१ लाख, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची लांबी वाढवणे २४.६८ लाख, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची मासळी केंद्राला जोडणारा रस्ता तयार करणे २४. ४० लाख, कवठी येथील बंदरवाडी येथे मासळी सुकविण्याचा ओटा तयार करणे १४. ६७ लाख, कवठी येथे उघडा निवारा बांधणे १५. ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामांचे भूमिपूजन  करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.