
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करू शकणार आहेत. लोकायुक्त, उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यासंदर्भात सातत्याने ही मागणी केली होती. आज यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याने अण्णांच्या मागणीला मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
























































