
सामना ऑनलाईन,चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये एकाचवेळी चार वाघ रस्त्यावर आरामात फिरताना दिसले. एकारा-मेंडकी मार्गावर हे वाघ बघितल्यानंतर प्रवाशांची बोबडीच वळाली होती. प्रवाशांपेक्षा जास्त दहशत इथल्या स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या या वाघांमध्ये एक वाघीण असून इतर वाघ हे तिचे बछडे आहेत.




























































