
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिवसेंदिवस रंगत जाणार्या ‘माझ्या नवर्याची बायको’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. राधिका, गुरुनाथ आणि शनायासोबतच मालिकेतील इतर व्यक्तिरेखांवरदेखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाक करतात. गुरूच्या चुका पोटात घालणारी आणि वेळ प्रसंगी त्याला रागावणारी गुरूची आई ही प्रेक्षकांमधलीच एक झाली आहे. रसिकप्रेक्षकांना हे माहिती नाही आहे की गुरूची आई म्हणजेच अभिनेत्री भारती पाटील या मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला.
याबद्दल बोलताना भारती म्हणाल्या, ’मेकॅनिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर माझे करीअर व्यवस्थित चालू होते. एकीकडे भरतनाट्यमही सुरू होते. न ठरवता अभिनय क्षेत्रात आले आणि रमले. इंजिनीअरिंग पूर्ण होईपर्यंत मी एकही नाटक पाहिलेले नव्हते.’ या मालिकेतील नागपुरी बाजाची गुरूची आई वठवताना खूप मजा येते आहे. माझे सासर नागपूरचे असल्याने माझे दीर, नणंदा यांच्या वागण्या-बोलण्याचे केलेले निरीक्षण या केळी माझ्या कामी आले.


























































