बंगळुरूत लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,बंगळुरू

बंगळुरूमध्ये आज हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे मिराज-2000 हे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून समीर अब्रोल, सिद्धार्थ नेगी या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. या दोन्ही वैमानिकांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर उडी घेतली; पण क्रूर काळाने त्यांच्यावर अखेर झडप घातलीच.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या येमालूर येथील धावपट्टीवर सकाळी 10.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेतील दोन्ही वैमानिक हे स्क्वॉड्रन लीडर होते. हे विमान अपग्रेड केल्यानंतर एचएएलने या विमानाच्या उड्डाणाला मंजुरी दिली होती. हिंदुस्थानकडे फ्रान्सकडून आयात केलेली एकूण 50 मिराज लढाऊ विमान आहेत. या विमानांचे आधुनिकीकरण सुरू आहे.