आयपीएस अधिकारी ऋषी कुमार सीबीय संचालकपदी, दोन वर्षासाठी नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी पोलीस सेवेचे ज्येष्ठ अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ऋषी कुमार शुक्ला मध्य प्रदेशच्या 1983 च्या केडरचे अधिकारी आहेत. त्यांना दोन वर्षासाठी नियुक्त करण्यात आले आहे. शुक्ला यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महानिर्देशक पद भुषवले आहे. मंत्रीमंडळाच्या समितीने त्यांची नियुक्तीस हिरवा झेंडा दाखवला आहे.

शुक्रवारी सीबीआय संचलाकपदाची नियुक्त करण्यासाठी समिती स्थापन झाली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे आणि मुख्य न्यायमूर्ती रंजग गोगोई उपस्थित होते. दोन तास या समितीची बैठक चालली आणि 30 नावांवर समितीत चर्चा झाली.

गेल्या काही दिवसांत सीबीआय संचलाकपदावरून चांगलीच खडाजंगी झाली होती. आधीचे सीबीआय संचालक आलोक कुमार वर्मा यांना हटवून दुसरीकडे बदली करण्यात आली होती.