पेंडूर-खरारे येथे वीज उपकेंद्राचे उदघाटन: २१ गावांसह मालवण शहर व अन्य गावांनाही होणार फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण तालुक्यातील पेंडूर-खरारे येथे उभारणी करण्यात आलेल्या वीज उपकेंद्राचे उदघाटन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

दरम्यान, या उपकेंद्राच्या माध्यमातून लगतच्या २१ गावातील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत खासदार राऊत व आमदार नाईक यांचे आभार मानले.

यावेळी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, सहाय्यक अभियंता यशोदीप कद्रेकर, उपकार्यकरी अभियंता वीरेंद्र सिंह, सहाय्यक अभियंता सुजित शिंदे, कनिष्ठ अभियंता योगेश खैर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बाळ महाभोज, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवा भोजने, श्वेता सावंत, अतुल बंगे, दर्शन म्हाडगूत, विशाखा पेंडूरकर, सुर्यकांत सावंत, विनोद सावंत, संदीप सावंत, अण्णा गुराम, अक्षय रेवंडकर, अमित पाडावे, शेखर रेवडेकर, सुहास साटम, जगदीश मोरजकर, आतू फर्नांडिस आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज थकबाकी अत्यल्प आहे. असे असताना येथील ग्राहकांना वीज समस्यांतून मुक्ती मिळावी यासाठी तालुक्यात वीज उपकेंद्रांची निर्मिती करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात सुरळीत व विनाखंडीत वीज पुरवठा प्रत्येक ग्राहकाला व्हावा, हेच आपले लक्ष असल्याचे आमदार, खासदारांनी बोलताना स्पष्ट केले. तर या वीज उपकेंद्रासाठी एक रुपया दराने विनामोबदला ४८ गुंठे जमीन उपलब्ध करून देणाऱ्या रवींद्र बावकर यांचेही खासदार राऊत व आमदार नाईक यांनी विशेष आभार मानले.

मालवण शहर व अन्य गावांनाही होणार फायदा
पेंडूर-खरारे वीज उपकेंद्रातून लगतच्या २१ गावांबरोबरच मालवण शहर व अन्य गावांनाही या उपकेंद्राचा फायदा होणार आहे. कुंभारमाठ उपकेंद्रावरील भार कमी होणार आहे. तसेच विरण व ओरोस केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांना आकस्मिक परिस्थितीत वीज पुरवठा केला जाईल, असे वीज अधिकाऱ्यांनी सांगितले.