
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याज जम्मू, कश्मीर आणि लेहमध्ये रॅली आहे. या दौर्यात ते जम्मू कश्मीरमधील अनेक विकास कामांचे भूमीपूजन करणार आहे. कश्मीर दौर्यातील महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या उपस्थितीत शहीद जवान औरंगजेब यांचे वडील मोहम्मद हनीफ भाजपमध्ये सामील होणार आहेत.
शहीद औरंगजेब यांना दहशतवाद्यांनी अपहरण करून ठार केले होते. मोहम्मद हनीफ भाजपने केलेल्या कामातून समाधानी आहेत. जर कोणी कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतो तर भाजप करू शकतो असा विश्वास हनीफ यांना वाटतो. शहीद जवानांचे कुटुंबीय हे भाजपच्या मागे आहेत असा संदेश हनीफ यांना द्यायचा आहे. मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर हुर्रियतने कश्मीर बंदचे आवाहन केले आहे.
























































