
सामना ऑनलाईन । मुंबई
जद(यू)चे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी मंगळवारी ‘मातेश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडरवर शेअर केला आहे.
Today Uddhav Thackeray ji and I had a special visitor over lunch. Some great talks @PrashantKishor ji. pic.twitter.com/LerBwfGp8E
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 5, 2019
दरम्यान, या भेटीबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी, प्रशांत किशोर हे एनडीएतील सहयोगी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत आणि याच नात्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली असे म्हटले. तसेच ही राजकीय भेट नसल्याचेही राऊत म्हणाले.
Sanjay Raut, Shiv Sena on JDU leader and strategist Prashant Kishore: He is a leader of one of NDA’s allies and he met Uddhav ji in that regard. See it as a courtesy visit and not a political visit. pic.twitter.com/ofNTIOEchO
— ANI (@ANI) February 5, 2019




























































