हार्दिक पटेल लोकसभा लढविणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hardik patel

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पटेल समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल हे आगामी लोकसभेची निवडणूक लढविणार आहेत. गुजरातमधील पोरबंदर, अमरोली हा भाग पटेलबहुल आहे. यापैकी एका मतदारसंघाची ते निवड करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 25 वर्षे वयाची अट आहे. गतवर्षी जुलैमध्येच हार्दिक यांनी वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. पोरबंदरमध्ये सातपैकी दोन आमदार काँग्रेसचे तर एक आमदार राष्ट्रवादीचा आहे. हे तिन्ही आमदार हार्दिक यांना पाठिंबा देणार आहेत. तसेच पोरबंदर, अमरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत पाटीदार, पटेल समाज बहुसंख्य आहे.