गरीबांच्या शिक्षणासाठी धडपडणारा सायकल गुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

देशभरातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सायकलवरून भ्रमंती करणारे आदित्यकुमार यांनी लखनौ येथून थेट मुंबई गाठली आहे. प्रत्येक गरीब मुलाला शिक्षणाचा हक्क मिळेपर्यंत ही सायकलवारी सुरू राहणार असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.

उत्तर प्रदेशातील फरकाबाद जिह्याच्या सलेमपूर गावात राहणाऱया आदित्यकुमार बी.एस.सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. 1992 पासून त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी राज्यभर भ्रमंती सुरू केली. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांपर्यंत पोचण्याची धडपड सुरू केली. 12 जानेवारी 2015 रोजी त्यांनी सायकलवरून आओ हिंदुस्थान को साक्षन बनाये, हर बेसहारा को शिक्षा मिले यही है प्रयास अशी घोषवाक्ये लावलेली फलक सायकलवर चिकटवून प्रसार सुरू केला. उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदिगढ, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरीयाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र असा एक लाख 17 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे.

– सायकल सफरीत विविध गावे आणि शहरांतील रस्त्यावरच अंथरुण टाकून विश्रांती घेत असल्याचे आदित्यकुमार सांगतात.
– आदित्यकुमार यांच्या शिक्षणासाठीच्या धडपडीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. याशिवाय अमेरिकेच्या गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह परदेशातील प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे.