तब्येत सांभाळा! गार वारा सुटला, पुन्हा शेकोटी पेटवा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट झाल्याचे दिसत आहे. मधले काही दिवस थंडी कमी झाली होती, परंतु दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा पारा पुन्हा खाली आला असून थंडगार वाराही सुटल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा शेकोटीचा सहारा घेतला आहे. अनेक ठिकाणी पारा 15 ते 20 अंशांपर्यंत खाली आहे.

गुरुवारी आणि शुक्रवारी हवेत गारवा होता आणि गार वाराही सुटला होता. त्यामुळे नागरिकांनी बॅगांमध्ये घडी केलेले स्वेटर आणि कानटोपी पुन्हा बाहेर काढल्याचे दिसले. दिवसाही लोक उबदार कपडे घालून फिरताना दिसत होते.

दरम्यान, शीतलहरीमुळे तब्येतीच्या तक्रारी सुरू होण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञांनी तब्येत जपण्याची सल्ला दिला आहे. बाहेरचे खाणे टाळण्यास सांगितले असून गारठ्यात उबदार कपडे घालूनच बाहेर फिरा असेही सांगितले आहे.