बॉलिवूड अभिनेता महेश आनंद यांचे निधन, मृत्यूचे कारण अस्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदी चित्रपटात 1980  ते 90 च्या दशकात खलनायकाची भुमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचे निधन झाले आहे. नुकतंच त्यांनी गोविंदाचा चित्रपट रंगीलातून त्यांनी पुनर्पदार्पण केले होते. त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी आढळला असून त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

महेश आनंद यांनी 80 व 90 च्या दशकात खलनायकाच्या भुमिका साकरल्या. शहेनशा, मजबूर, स्वर्ग, थानेदार, विश्वात्मा सारख्या सुपर हिट चित्रपटात त्यांनी खलनायकाची भुमिका केली होती. 18 वर्षानंतर पहलाज निहलानी यांच्या रंगीला चित्रपटात गोविंदासोबत त्यांनी चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण केले होते. त्यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळेल.