कुलगाममध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू आणि कश्मीरममधील कुलगाममध्ये चकमकीत आतापर्यंत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील केल्लम देवसरा भागात सैन्याचे जवान आणि दहतवाद्यांमधे चकमकीत सुरू आहे. सकाळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतरही चकमक सुरूच असून आणखी 3 दहशतवाद्यांना ठार केले आहे.

केल्लम देवसरा भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे या परिसराला जवानांनी वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केले. जवानांची चाहूल लागताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. मात्र सावध जवानांनी त्याला तत्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.