स्मृतिभ्रंश रुग्णांच्या उपचारासाठी 28 जिल्ह्यांत ‘मेमरी क्लिनिक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांवर उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशनासाठी राज्यातील 28 जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 300 रुग्णांकर स्मृतिभ्रंशाचे उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मेमरी क्लिनिकच्या माध्यमातून डिसेंबरअखेरपर्यंत 2200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 300 रुग्णांना स्मृतिभ्रंशांचे निदान करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

या जिल्ह्यांत मेमरी क्लिनिक
जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आजारासंबंधी तपासणी रोज केली जाते; मात्र स्मृतिभ्रंशासंबंधी आजाराच्या रुग्णांची आठवडय़ातून दोन दिवस तपासणी केली जाते. आतापर्यंत रायगड, नगर, अमराकती, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, धाराशीव, परभणी, नाशिक, सिंधुदुर्ग, वर्धा, नंदुरबार, सातारा, चंद्रपूर, पुणे, ठाणे, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या जिल्हय़ामंध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.