
सामना ऑनलाईन । कैरो
हिंदुस्थानात अनेक मुलांना पबजी या खेळाचे व्यसन लागले आहे. या खेळासाठी आत्महत्या करणे, घरच्यांना सोडणे इथपर्यंत या खेळाचे व्यसन तरुणांमध्ये वाढलेले आहे. त्यामुळे या खेळावर काही राज्यांनी बंदी देखील घातली आहे. असे असताना इजिप्त या देशात मात्र पबजी या खेळामुळे तरुणतरुणीचे सूत जुळल्याची एक घटना समोर आली आहे. त्या दोघांचा साखरपुडा देखील झाला असून लवकरच ते लग्न करणार आहेत.
Started from pubg , now we’re here ♀️♥️ pic.twitter.com/3F547LXyAi
— ﮼نورهان (@Nourhanlhashish) February 10, 2019
पबजी हा खेळ तुम्ही जगातल्या कोणत्याही व्यक्तीसोबत खेळू शकता. जी व्यक्ती ऑनलाईन असेल त्या व्यक्तीसोबत तुम्ही या गेमचे चॅलेंज घेऊ शकता. इजिप्तमधील नौऱ्हान अल हशीश याला देखील पबजी खेळण्याचे वेड होते. एक दिवस पबजी खेळत असतानाच एक तरुणी त्याच्यासोबत हा खेळ खेळू लागली. हळू हळू ते दोघे एकाच वेळी हा खेळ खेळण्यासाठी ऑनलाईन येऊ लागले. काही दिवसांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व नुकतेच त्यांचा साखरपुडाही झाला आहे. नौऱ्हानने ट्विटरवर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
























































