मोटारसायकलच्या डिक्कीतून ४० हजार पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । लातूर

मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना उदगीर येथे घडली.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलीम मोहियोदीन शेख रा. खैर नगर शेलाळ उदगीर यांनी तक्रार दिली. १४ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीमधून ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी केंद्रे करीत आहेत.