काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून पाचशे फूट मागे गेली आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, हडोळती

येथील बसथांब्यावर शिवाजी चौकात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॅली तुटून पाचशे फुट रिव्हर्स आल्याने या रहदारीच्या ठिकाणी ट्रॉली रिव्हर्स सुसाट निघाली व लोंकाची एकच धावपळ उडाली. त्यामुळे ट्रॉलीच्या टायर खाली दुकानासमोर उभी केलेली स्कूटी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला व ही ट्रॉली एका कठड्याला जाऊन धडकली, त्यामुळे ट्रॉली थांबली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती आल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.

सायंकाळी पाचच्या सुमारास हिप्पळगांव येथून उसाने भरलेला ट्रॅक्टर हडोळती बस थांब्यावर आला. मुखेड-शिरूर रोडवर वाहतुकीची कोंडी झाली होती. दोन्ही बाजूला ग्रामपंचायतचे गाळे आसल्यामुळे या चौकात आतिक्रमण वाढले असून त्यामूळे रस्ता अरुंद झाला आहे. या चौकात चढ असल्यामुळे चालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. अवजड वाहनासाठी तर फारच कठीण झाले आहे. त्यामुळे बसथांब्यावरील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या महिला मुले, प्रवाशांची ये-जा असते. तसेच ट्रॅव्हल्स बुकिंगमुळे या रस्त्यावर ट्रॅव्हल्स बऱ्याच वेळ थांबतात त्यामूळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते व त्यामुळे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.