
सामना प्रतिनिधी । नागपूर
कुंभमेळ्याहून नागपूरला परतणारी बस ओढ्यामध्ये पडून अपघात झाला. या अपघातात 4 जण ठार झाले तर 46 जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे साडे तीन वाजता ही दुर्घटना घडला.
सर्व प्रवासी प्रयागराजहून नागपूरला जात होते. वाटेत येताना मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी रुग्णवाहिका पाचारण केल्या. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडलेल्या बसला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. अपाघातावेळी सर्व प्रवासी झोपेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.






























































