इन्शुरन्स सेटलमेंटच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

इन्शुरन्स सेटलमेंटच्या नावाखाली वृद्धाची 52 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे नाहूर परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना दोनजणांनी वेगवगळ्या नावाने फोन केला. आपण इन्शुरन्स सेटलमेंट सल्लागार असल्याचे भासवले. इन्शुरन्सचे सेटलमेंट दोन दिवसांत करून 1 कोटी 37 लाख 50 हजार रुपये मिळवून देतो अशा भूलथापा मारल्या. बनावट दस्तावेज तयार करून 52 लाख 37 हजार रुपयांचा अपहार केला. फसवणूकप्रकरणी तक्रारदारांनी कांजुरमार्ग पोलीस ठाणे घातले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.