मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाला अस्वच्छतेबद्दल 20 हजारांचा दंड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई भेटीवर आलेल्या पॅसेंजर सर्व्हिस कमिटीने दादर रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेबद्दल तसेच स्वच्छतेसंदर्भातील घोषवाक्ये प्रदर्शित न केल्याने संबंधित कंत्राटदारावर 20 हजार रुपयांचा दंड लावण्याची शिफारस मध्य रेल्वेला केली आहे.

पॅसेंजर सर्व्हिस कमिटीने सोमवारी दादर रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला भेट दिली. त्यावेळी कमिटीचे अध्यक्ष रमेश चंद्ररत्न आणि कमिटीचे सदस्य जय नागवानी उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील स्वच्छतेबद्दल समाधान न झाल्याने कमिटीने संबंधित कंत्राटदारावर 20 हजार रुपयांचा दंड बजावण्याची शिफारस मध्य रेल्वेला केली आहे. यावेळी कमिटीने दोन्ही स्थानकांच्या कॅटरिंग, तिकीटिंग, प्रवासी विश्रांतीघर, जनआहार आणि वेंडिंग स्टॉलचीही पाहणी केली, मात्र दादर स्थानकाच्या स्वच्छतेबद्दल कंत्राटदाराला दंड फर्मावण्याची सूचनाही केली.